@दिलीप चव्हाण 

1980 च्या दशकात सुरेश जैन या मोदी शहा सारखे सगळे हातखंडे माहिती असलेल्या धेंडा ने काँग्रेस च्या माध्यमातून  जळगाव च्या राजकारणात प्रवेश  केला. प्रचंड पैशाचा वापर करून त्याने जळगाव च्या राजकारणावर घट्ट पकड बसवली.  दर्डा कुटुंबियांशी नाते असल्या कारणाने त्याने काँग्रेस कडून प्रथम उमेदवारी मिळवली. पण नंतर मात्र काँग्रेसने त्याला  थारा दिला नाही.  मिळवण्यासाठी त्याने खुप वेळा प्रयत्न केले. पण कॉग्रेस पक्षाने त्याला पुन्हा कधी जवळ  केले नाही. मग त्याने प्रथम शरद पवारांची काँग्रेस व नंतर  शिवसेना भाजप युती मार्फत जिल्ह्याच्या राजकारणावर घट्ट पकड ठेवली. सुरेश जैन म्हणजे मोदीचीच छोटी आवृत्ती होती. खोटी माहिती पसरवून विरोधकांना बदनाम करणे, अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊन जनतेसमोर विकासाचे चित्र रंगवणे. त्यात इतर नेतृत्व कसे बुद्धू व अकार्यक्षम आहे हे त्याच्या भाडोत्री यंत्रणेमार्फत जनतेमध्ये ठसवणे व त्याचा लाचार भक्त संप्रदाय तयार करणे. विचारधारा नैतिक मूल्य याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नव्हते. त्यामुळे एकाच वेळेस हिंदुत्ववादी व मुस्लिम कट्टरतावादी यांचे समर्थन मिळवण्याचे कसब त्याच्यात होते. अशा हातखंड्यांच्या झंझावातात त्याने सर्वपक्षीय विरोधकांना गर्भगळीत केले व आपल्या दावणीला बांधले. त्याला अपवाद फक्त माझे दिवंगत काका के. डी. आबा पाटील व कॉम्रेड स. ना. भालेराव या दोघांनी त्याच्याशी सुरुवातीपासून शेवट पर्यंत लढा दिला. त्यात त्यांच्या मागे  बाळासाहेब मधुकरराव चौधरी  सातत्याने पाठीशी राहिले.

जिल्ह्यातील सर्वपक्षीय पुढारी त्याचे मिंधे होते. फक्त हे तीनही लोक त्याला बळी पडले नाहीत. या झोटिंगशहा  विरोधात ते कायम उभे राहिले. सर्व विरोधकांना कब्जात घेतल्यानंतर जैन ला मोकळं रान मिळणार होतं. पण के. डी. आबा व बाळासाहेब चौधरीनी ते त्याला  मिळू दिले नाही. त्याच्या पॅनल च्या विरोधात पॅनल उभे करून त्याचा सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न दहा वर्ष लांबवला. नंतर मात्र त्याने हळू हळू शेतकऱ्यांच्या  सगळ्या सहकारी संस्था ताब्यात  घेतल्या व संपवल्या. के. डी. आबांच्या निधनानंतर ही लढाई त्यांचे शिष्य नरेंद्र अण्णा पाटील यांनी चालू ठेवली. प्रवीण गेडाम सारखा कर्तव्यदक्ष अधिकारी जळगावला पालिकाआयुक्त म्हणून आले. नरेंद्र अण्णांच्या तक्रारीची त्यांनी दखल घेतली. त्याची परिणीती आज सुरेश जैनला शिक्षा होण्यात झाली. पण वाईट या गोष्टीचे वाटते हे पाहायला नरेंद्रअण्णा पाटील ही आज नाहीत.

के. डी. आबा पाटील 12 वर्ष जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 25 वर्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन या संस्थांचे ते संचालक तर मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष पण होते. तर कॉम्रेड स. ना. भालेराव जळगाव चे आमदार व अनेक वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. या दोनही नेत्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांच्या बँक खात्यात काही हजार रुपये होते. व राहण्याचं घर या पलीकडे मालमत्ता नव्हती. अशा निर्धन  माणसांनी आपला आत्मसन्मान गहाण न ठेवता लढा दिला व त्यांच्या मृत्यू नंतर नरेंद्र पाटलांनी तो चालू ठेवला तेव्हा कोठे सुरेश जैन व त्याच्या सहकार्याना शिक्षा झाल्या.

आमचे काका  2003 मध्ये वारले. तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारा साठी  आमचे नातेवाईक व त्यांचे हितचिंतक आले होते. त्यांच्या चर्चेचा सुर असा होता की, के. डी. आबांनी  इतके वर्ष सत्तेवर राहून मुलांसाठी काहीच कसे  कमावून ठेवले नाही! किमान  शिक्षण संस्था काढून ठेवल्या असत्या तर मुलांना उत्पन्नाचे साधन झाले असते.  म्हणून त्यांना दोष दिला. के. डी. आबांच्या पत्नी, आमच्या काकू या प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या धाकटया बहीण होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *