कृपाशंकर सिंग, हर्षवर्धन पाटील, गणेश नाईक, वैभव पिचड, मधुकर पिचड आदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी टीका केली होती. अनेक आरोप प्रत्यारोप या नेत्यांनी एकमेकांविरोधात केले. विधिमंडळात किंवा सभागृहाबाहेर आरोप करण्यात आले. ज्या नेत्यांवर भाजपने आरोप केले होते आणि ज्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले होते आता हेच नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत आणि भाजपने त्यांना पक्षात घेतलं आहे.

भाजपने ज्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप लावले होते आता तेच नेते भाजपमध्ये आल्याने सदाचारी झाले का? हा सवाल सर्वसामान्य जनतेला जरूर पडला असेल.

एकमेकांवर केलेल्या कुरघोडींचा हा आढावा.

सत्तेचा दुरुपयोग करीत कृपाशंकर सिंग यांनी कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. दोन निवडणुकांमध्ये त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये दोन वेगवेगळे पॅन क्रमांक दिले होते. कृपाशंकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी कागदपत्रं सादर केली होती.

                  – अरुण देव , भाजप पदाधिकारी

 कृपाशंकर सिंग हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून, अशा नेत्याला मुंबईच्या अध्यक्षपदी कायम ठेवणे हे काँग्रेससाठी शोभादायक नाही.

भाजप प्रवक्ते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *