मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही असा अजब दावा शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी केला आहे. यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आहेत.

मुंबईच्या रस्त्यांवर मी रोज प्रवास करतो. मुंबईच्या रस्त्यांवर आजपर्यंत मला एकही खड्डा दिसलेला नाही आहे, असं शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे. काही ठिकाणी खड्डे असतील तर ते मेट्रोच्या कामामुळे आहेत. नगरसेवक एवढ्यावरच न थांबता, मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तुम्ही मला एखादा तरी खड्डा दाखवा, असं आव्हान देखील दिलं आहे.

माझ्यासारखा रोज प्रवास करणाऱ्या व्यक्तीला एकही खड्डा दिसलेला नाही. जे काही खड्डे असतील तर ते केवळ मेट्रोच्या कामामुळे आहेत. मात्र, मी खात्रीने सांगू शकतो की मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा नाही. तसंच मुंबईकरांना रस्त्यांवर खड्डा दिसला तर तो खड्डा दोन तासांच्या आत बुजवला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईच्या रस्त्यांनी घेतला सात जणांचा बळी

यावर्षी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण छोट्या अपघातांमध्ये जखमी झाले आहेत. अलीकडेच वांद्र्यातील ४७ वर्षीय रिक्षा चालकाचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *