नांदेड जिल्ह्यातील पाच गावांनी तेलंगण राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  नालगाव, भोकर, डिग्लूर, किनवट, हाथगाव या गावातील लोकांनी ही मागणी केली आहे. ही पाच गावे महाराष्ट्र आणि तेलंगण सीमावर्ती भागातली आहेत. या पाच गावातील पुढाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे.

तेलंगणा सरकार गरिबांना महिन्याला २,०१६ रुपये देत आहे. तर महाराष्ट्र सरकार गरिबांना फक्त ६०० रुपये देत आहे. तेलंगणामध्ये शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा होतो. या योजना महाराष्ट्र सरकाराने लागू कराव्यात नाहीतर, आम्हाला तेलंगण राज्यात विलीन कराव अशी मागणी या गावांनी केली आहे. ही माहिती तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *