हवामानातील बदलाचे संकट साऱ्या जगावर आहे. या संकटावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात हवामान कृती परिषद सुरू आहे. या परिषदेत ग्रेटा थनबर्ग या १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीने जगभरातील नेत्यांवर राग व्यक्त केला आहे. ”मला या वेळी इथे नाही तर शाळेत गेले पाहिजे होतं. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या खोट्या शब्दांमुळे माझे बालपण हरवलं आहे” या शब्दात तिने जगभरातील नेत्यांवर टीका केली आहे.

 

*कोण आहे ग्रेटा थनबर्ग*

ग्रेटा थनबर्ग ही स्विडिश देशातील १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती आहे. ग्रेटाने आपल्या देशात हवामानातील बदल थांबवण्यासाठी स्विडिश संसदेबाहेर संप पुकारला होता. ग्रेटाने २०१८ मध्ये झालेल्या टेडेक्सटॅाकहोममध्ये हवामानातील बदल विषयी भाषण केलं होतं. कालच्या युएन हवामान कृती परिषदतील तिने केलेल भाषण प्रचंड व्हायरल होत आहे. कालच्या भाषणात तिने पर्यावरणा विषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *