सोशल मीडियाच्या गैरवापरावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावी असं सांगत सुप्रीम कोर्टाने सरकारला तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. तसंच यासंबधी प्रतिज्ञापत्र ही सादर करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. सोशल मीडियाला आधार कार्ड जोडण्याच्या संर्दभातील या याचिकेवर सुनावणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारला कठोर प्रश्न विचारले आहेत. वेळ आली आहे की, केंद्र सरकारने या विषयाकडे आपल लक्ष दिलं पाहिजे. आपण इंटरनेटची चिंता का करतो? आपण देशाची चिंता करुयात. सोशल मीडियाच्या संर्दभात कठोर नियमावलीची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गोपनीयतेची सुरक्षितता असलीच पाहिजे. मला ट्रोल करणारे आणि माझ्या माझ्या विषयीची
खोटी माहिती पसरवणारे सक्षम का आहेत, असा सवाल न्यायमूर्ती गुप्ता यांनी सरकारला विचारला आहे. गोपनीयतेविषयी सरकारने कठोर नियम केले पाहिजेत असं ही कोर्टाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *