बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असं म्हणत भाजपाच्या ‘रम्या’ने राष्ट्रवादीच्या पवारांना डोस दिले आहेत. आपण चांगलं-वाईट केलं असेल पण कधी तुरुंगात गेलो नाही,असा टोला गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा यांना पवारांनी लावला होता.दरम्यान आता यालाच भाजपच्या ‘रम्या’ ने उत्तर दिलं आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना भाजपचा रम्या चांगलाच चर्चेत आहे.

तुरुंगात न गेल्याचं बिरुद मिरवणाऱ्या पवारांना रम्या म्हणतो बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है ‘ असा मथळा असलेलं एक व्यंगचित्र भाजपने काढलं आहे. या व्यंगचित्रात रम्याला एकजण म्हणतो, रम्या साहेब म्हणतात मी अनेक बरी-वाईट कामं केली. पण तुरुंगात कधी गेलो नाही. त्यावर रम्या म्हणतो, ते जाऊदे रे! मुन्नाभाईचा डायलॉग बघ ना. म्हणतोय बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाइम होता है रे..

हॅशटॅग बारामतीकरामती आणि @NcpSpeaks या राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलला टॅग केलं आलं आहे. यावरुन हा टोला शरद पवार यांना आहे हे उघड आहे. दरम्यान, शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मंगळवारी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर ही कारवाई सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सूड भावनेने केली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसंच शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसच शुक्रवारी आपण ईडी कार्यालयात पाहुणचार घेण्यासाठी जात आहोत असाही टोलाही लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *