भाजपाचे नेते चिन्मयानंद यांना आज अटक करण्यात आली आहे. (एसआयटी) विशेष तपास पथकानं चिन्मयानंद यांना शहाजहांपूर मधील आश्रमातून ताब्यात घेतलं आहे. चिन्मयानंद यांच्यावर लॉ कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एक विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे लॉ कॉलेज चिन्मयानंद यांच्या मालकीचे आहे. विद्यार्थिनीने आरोप केला आहे की चिन्मयानंद यांनी वर्षभर तिचे लैंगिक शोषण केलं होतं. या आरोपांच्या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये विद्यार्थिनी झोपलेल्या व्यक्तीचा मसाज करीत आहे.

या व्हिडीओ नंतर उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलं. प्रियांका गांधींनी याप्रकरणावर टीका करत योगी सरकारला लक्ष केलं होतं. यानंतर चिन्मयानंद यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली होती.

पीडितेन प्रसार माध्यमांसमोर असं म्हटलं की, चिन्मयानंद यांना अटक करा नाही तर मी आत्महत्या करीन. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित झाले होते. तसंच पीडितेन देखील एसआयटीच्या तपासातील दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज सकाळी एसआयटीने चिन्मयानंद यांना अटक केली. या प्रकरणाचा अहवाल २३ तारखेला न्यायालयामध्ये सादर केला जाईल, असं एसआयटीकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *