आरएसएसच्या सांगण्यावरून प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत युती तोडली असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये आरएसएसशी निगडित असलेली माणसे शिरली आहेत. दोन महिने जागा वाटपाबाबत आमच्याशी चर्चा करत होते. दुसरीकडे काँग्रेससोबत देखील बोलणी सुरू ठेवली. आमच्याशी चर्चा करत आम्हाला केवळ आठ जागा देण्यात आल्या. यामुळे आम्ही आता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जलील यांनी जाहीर केलं आहे.

सेना-भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वेगळी आघाडी तयार करण्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन एकत्र आले होते. वंचितच्या पार्लमेंटरी बोर्डातील सदस्यांनी मला ओळख करून देताना, माझ्यामागे दोन कोटी लोक आहेत असं म्हटलं होतं. मग अशा लोकांनी देखील मुख्यमंत्री व्हावं, असं जलील म्हणाले.

ओवैसींच्या परवानगीने पत्रक काढलं

पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या परवानगीने मी युती तोडण्याबाबत पायरक प्रसिद्ध केलं. वंचितचे प्रवक्ते, नेते काहीही बोल्ट असून विनाकारण मला ‘व्हिलन’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही वंचितची मंडळी बोलणी सुरू असल्याचं सांगत आहेत. मात्र, नेमकी कोणासोबत बोलणी सुरू आहे हे सांगावं. तसंच एमआयएमला १७ जागा दिल्याची अफवा पसरवण्यात आली. पण, हा आकडा कुठून आला हे देखील वंचितने सांगावं, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *