अनुप्रिया मधुमिता लाक्रा ही देशातील पहिली महिला आदिवासी पायलट बनली आहे. विशेष म्हणजे अनुप्रिया ओडिशाच्या मलकानगिरी या नक्षलग्रस्त भागातून आलेली आहे. अनुप्रिया लवकरच इंडिगो एअरलाइन्समध्ये सह-पायलट म्हूणून रुजू होणार आहे.

अनुप्रियाने आपलं अभियांत्रिकेचं शिक्षण सोडलं. तिने 2012 मध्ये एव्हिएशन अकादमीमध्ये प्रवेश घेतला. अनुप्रियाने पायलटपर्यंतचं शिक्षण घेण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. अनुप्रियाचे वडील हवालदार आहेत. तिच्या कामगिरीबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचं अभिनंदन करत असं म्हटलं की, अनुप्रियाने मिळवलेल्या यशामुळे अनेकांना तिच्याकडून प्रेरणा मिळेल. आदिवासी भागातील पहिली महिला पायलट झाल्यामुळे सोशल मीडियावर ही तिचं कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *