मेट्रोचा प्रवास किती सोयीचा आहे हे सांगत आता अक्षय कुमारने मेट्रोचा प्रवास केला आहे. अभिनेता अक्षय कुमारने याप्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. अक्षय कुमार काल घाटकोपरमध्ये शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यावर वर्सोवाला पोहोचायचं होतं. त्यावेळी त्याने घाटकोपर ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण केला. गाडीने प्रवास करण्यासाठी 2 तासाहुन अधिक वेळ लागतो हे कळल्यानंतर त्याने दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून मेट्रोने प्रवास केला.

मुंबईत सध्या मेट्रो कारशेडला प्रचंड विरोध होत आहे. मुंबईकर आरेमधील जंगलतोडीबाबत आंदोलन करत आहेत. हे आंदोलन न्यायालापर्यंत पोहचलं आहे. परंतू अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारने मुंबईच्या मेट्रो सेवेचं कौतुक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *