उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती गंभीर आहे. एम्सच्या ट्रॅामा सेंटरचे प्रमुख डॅा. राजेश मल्होत्रा यांनी पीडिताचं हेल्थ बुलेटिन जाहीर केलं आहे. डॅाक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला सध्या जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. पीडिताचे ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यासाठी औषधोपचाराची गरज आहे. पीडिताचे वकील देखील कोमात आहेत. पीडिताचे वकील महेंद्र सिंह यांना आज दिल्लीत उपचारासाठी नेण्यात आले.

पीडितेला हवाई रुग्णवाहिकेने सोमवारी सायंकाळी पुढच्या उपचारासाठी लखनऊ येथून नवी दिल्लीतील एम्स मध्ये हलवण्यांचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. २८ जुलै रोजी उन्नाव बलात्कारातील पीडितेच्या गाडीला रायबरेलीत ट्रकने धडक दिली होती. या अपघातात पीडित मुलीच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. तर पीडिती आणि वकिल गंभीर जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *