उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेला २५ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यसरकार ही नुकसान भरपाई देणार आहे. पीडितेने लिहिलेल्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. अनेक महत्वाचे आदेश दिले आहेत. तसंच पुढच्या पाच सुनावण्या दिल्लीत हलवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. येत्या ४५ दिवसांत या प्रकरणाची सुनवाई पूर्ण करण्याचे ही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पीडिताने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात पीडितेने आरोपींकडून सतत धमक्या येत असल्याची ही माहिती दिली आहे.
यावेळी मुख्य न्यायाधीशांकडे पीडित मुलीचा वैद्यकीय अहवाल ही देण्यात आला. पीडितेला हवं असेल तर उपचारासाठी दिल्ली येथे घेऊन जाता येईलं असं न्यायाधीशांनी सांगितलं. तसंच पीडितेच्या वकीलांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्याचे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *