उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला आज एयरलिफ्ट करुन  दिल्ली येथील एम्समध्ये उपचाराकरीता नेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सीआरपीएफच्या चोख बंदोबस्तात पीडिता आणि वकील यांना दिल्ली येथे नेण्यात येणार आहे. एयरलिफ्ट करण्यासाठी प्रशासनाला आज संध्याकाळ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. पीडितेवर लखनऊ मधील जॉर्ज मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु होते. पीडितेला न्यूमोनिया झाला आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

दिल्ली येथील तीस हजारी कोर्टमध्ये उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर आणि सह आरोपी शशि यांना तिहाड जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार या प्रकरणाची सुनवाई तीस हजारी कोर्टात होणार आहे.
सीबीआईने कुलदीप सिंह सेंगर यांच्या घरावर छापेमारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *