‘व्हू किल्ड करकरे’, हे पुस्तक लिहिणारे माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांचं नवीन पुस्तक  ‘ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध करत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राम्हण महासंघाकडून देण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला विरोध करायला आलेले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मयुरेश अरगडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत होती. प्रकाशन सोहळ्यात पाण्याची बाटली देखील घेऊन जाण्यास बंदी होती. या कार्यक्रमाला न्यायमूर्ती अभय ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड , माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आदी उपस्थित होते. तसंच मुकुंद काकडे यांनी सूत्रसंचालन केलं, तर ऍड. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक केलं. आभारप्रदर्शन सचिन गोडांबे यांनी केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *