पत्रकारितेच्या विश्वात आपली वेगळी ओळख बनवणाऱ्या एनडीटीव्ही इंडिया चे मॅनेजिंग एडिटर रविश कुमार यांना ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार मिळाला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्काराला आशियाचा नोबेल पुरस्कारसुद्धा म्हटलं जातं. रॅमन मॅगसेसे पुरस्कार आशियातील व्यक्तींना आणि संस्थांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जातो.

पुरस्कार निवड समितीने ट्विट करत रविश कुमार यांना हा पुरस्कार लोकांचा बनले त्यासाठी दिला गेला आहे, असं म्हटलं आहे. रविश कुमार यांचा प्राईम टाइम हा कार्यक्रम सामान्य लोकांच्या वास्तविक आणि दुर्लक्षित केलेल्या समस्यांवर प्रकाश टाकतो, असं रॅमन मॅगसेसे पुरस्कार संस्थेने म्हटलं आहे. सोबतच प्रशस्ती पत्रामध्ये, जर तुम्ही लोकांचा आवाज झालात तर तुम्ही पत्रकार आहात, असं म्हटलं आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे रविश कुमार भारतातील सहावे पत्रकार आहेत. याआधी अमिताभ चौधरी (१९६१), बिजी वर्गीज (१९७५), अरुण शौरी (१९८२), आर.के. लक्ष्मण (१९८४), पी. साईनाथ (२००७) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

बहुत बहुत बधाई मेरे दोस्त! – अरविंद केजरीवाल

रविश कुमार यांना २०१९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकून आंनद झाला. रविशचं रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांच्या क्लबमध्ये स्वागत करतो. आशा करतो की, या कठीण परिस्थितींमध्ये त्यांची बहादूर पत्रकारितेला मजबुती मिळेल. बहुत बहुत बधाई मेरे दोस्त!

– अरविंद केजरीवाल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *