@सुनील गजाकोश 

अमेझॉन जंगल म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे होती आता ती बाद झाली. जगाला २०% प्रायवायू पुरवणारी जंगले होती ती. तेथील सरकारने आधीच कॉर्पोरेटच्या फायद्यांसाठी जंगले तोडण्याचा सपाटा लावला होता, त्यात ही आग लागली फोफाट्याने पसरली… अवकाशातून संपुर्ण ब्राझील धुरात लोटलेला दिसला. पण ब्राझीलचा राष्ट्रपती बोलसोनारो (हा पण फेकू आहे) उलट्या बोंबा मारतो आहे, तिथे लोकांसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्थांनी आग लावली असा कांगावा करतो आहे. वरून ते म्हणतात कि, आग विझवणे त्यांना परवडणारे नाही. ह्यामाणसाने अमेझॉनच्या आदिवासी जमाती विरूद्ध अनेक वाईट कमेंट्स केलेले आहेत. हि आग म्हणजे त्या जंगलात राहणाऱ्या आदिवाश्यांची कत्तलच आहे.

पर्यवरणाची सुरक्षा आत्यवश्यक असताना अशी जंगले बाद होणे म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी…

हे जग अतिशय विकृत होत चालले आहे.
मानव जमात या पृथ्वीवर जगण्याच्या लायकीचा राहीला नाही.

हे जग लवकर नष्ट होवो…
जगाचा कोळसा होवो…
मानव जमात पूर्णपणे नष्ट होवो…

मग पृथ्वी पुन्हा फुलो… आणि
१००% प्राणवायु घेवून मानवा शिवाय
इतर प्राणी सुखाने जगो…

लाज वाटत आहे मानवांच्या क्रुरतेची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *