भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर एका विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. आरोप करणारी विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. अनेक वकीलांनी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून लक्ष घालावे अशी विनंती केली होती. आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

विद्यार्थीनी कायद्याचे शिक्षण घेत आहे. विद्यार्थीनी उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील रहिवासी आहे. विद्यार्थीनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या संदर्भातील तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विद्यार्थीनी असं सांगत आहे, की ‘संत समाजातील एक मोठा नेता अनेक मुलींचे आयुष्य खराब करत आहे. मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी पतंप्रधान मोदी आणि योगी यांना विनंती करते की माझी मदत करा’ विद्यार्थीनीकडे या प्रकरणात पुरावे देखील आहेत. स्वामी चिन्मयानंद हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर यापूर्वीही बलात्कार आणि अपहरणाचे आरोप झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *