देशातील राज्यांमध्ये जसं भाजपचं सरकार वाढत आहे. त्याच प्रमाणे भाजपच्या खात्यामध्ये देखील वाढ होत आहे. सद्यस्थितीत भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष आहे. एडीआरच्या अहवालानुसार भाजपच्या संपत्तीमध्ये २२.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६-१७ ला भाजपची १२१३.१३ कोटी एवढी संपत्ती होती. तर २०१७-१८ मध्ये वाढ होऊन १४८३.३५ कोटी रुपये झाली आहे.

या अहवालामध्ये काँग्रेसच्या संपत्तीमध्ये घट झाली आहे. काँग्रेसची २०१६-१७ मध्ये ८५४.७५ कोटी इतकी संपत्ती होती. तर २०१७-१८ मध्ये संपत्तीत घट होऊन ७२४.३५ कोटी रुपये झाली.

राष्ट्रीय पक्षांद्वारे घोषित केलेल्या देणगीची रक्कम ५१४.९९ कोटी आहे. यामध्ये काँग्रेस ने जाहीर केलेली रक्कम सर्वांत जास्त ४६१.७३ कोटी आहे. तर, भाजपने कमी २०.०३ कोटी इतकीच देणगी म्हणून रक्कम घोषित केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *