उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेंगरचं भाजप आमदार आशिष सिंह आशु यांनी समर्थन केलं आहे. आमदार कुलदीप सेंगर कठीण काळातून जात आहेत. आशा करतो की, ते लवकरच यातून बाहेर पडतील, असं भाजप आमदार आशिष सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी आरोपी आमदार कुलदीप सेंगरला पक्षातून निलंबित केल्याचं सांगितलं होतं. परंतु भाजप आमदार भर सभेतून कुलदीप सेंगरबद्दल कळवळा व्यक्त करत आहेत. मग भाजपने केवळ दिखाव्यासाठी कुलदीप सेंगरला निलंबित केलं का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भाजप आमदार आरोपी कुलदीप सेंगरला पक्षातून निष्कासित करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपोषण केलं होतं. केवळ निलंबन करून चालणार नाही. तसंच पीडित तरुणीला आणि वकिलांना चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं यासाठी उपोषण केल्याचं काँग्रेस नेते अजय कुमार लल्लु यांनी सांगितलं. यासह पीडितेचे काका महेश सिंह यांना एक महिन्यासाठी पॅरोल देण्यात यावा. त्यामुळे ते परिवाराला थोडं सांभाळू शकतील. काँग्रेस नेते अजय कुमार यांनी पीडित तरुणी अजूनही गंभीर अवस्थेत असून वकिलांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे, असं सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *