@शाक्य नितीन

पतंजलीचा ९८.५% मालक असणारा योगगुरू व आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण ऋषिकेश मधील एम्सवासी झाला आहे. योग आणि आयुर्वेदाने सगळेच आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या बाळकृष्णवर एम्सवासी होण्याची वेळ यावी हे धक्कादायक आहे. पतंजलीच्या नफ्याला मागील काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. देशभरात शेकडो पतंजली स्टोअर्स बंद होत आहेत कारण भक्तिभावाने ३ ते ४ महिने पतंजली प्रॉडक्ट वापरणारा माणूस नंतर क्वालिटीच्या समस्येमुळे प्रॉडक्ट बंद करतो. हे मला आमच्या एरियात पतंजली स्टोअर चालवणाऱ्याने सांगितलं. कदाचित सतत कमी होणारा नफा आणि इन्व्हेस्टरचा तगादा यातून निर्माण झालेल्या, स्ट्रेसचा बाळकृष्णच्या तब्येतीवर स्ट्रेसचा परिणाम झाला असावा.

योग आणि आयुर्वेदाने रोगमुक्ती होते. याबाबत माझ्या मनात शंका नाही कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण बाबारामदेव यांनी ज्या प्रकारे योगाचे पॉप कल्चर मध्ये रूपांतर केले आहे, ते धोकादायक आहे. पारंपरिक योग गुरू कोणताही प्राणायाम सुरवातीला मोजून ३ ते ५ प्राणायाम आणि जास्तीत जास्त दोन ते तीन आवर्तने करायला सांगत असताना. बाबा रामदेव यांनी लोकांना कपालभाती आणि अनुलोम विलोम अर्धा तास ते एक तास करायला लावतात, यावर लोक नाराज आहेत. त्याचे शरीरावर निश्चित दुष्परिणाम होतात. दिल्लीत जंतर मंतरवर भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करणारे योगगुरू बाबा रामदेव केवळ दोन दिवसाच्या उपोषणाने पार ढेपाळून गेला होते. नखं घासल्याने केस पांढरे होत नाही म्हणणाऱ्या रामदेव बाबांच्या डोक्यात आणि दाढीत चांदी पडली आहे. रामदेवबाबा यांनी गुडघ्यावरील उपचारासाठी लंडन गाठले होतं.

योग आणि प्राणायाम हा घाईगडबडीत करण्याचा व्यायाम प्रकार नसून तो सावकाश आनंद घेत मनाशी व शरीराशी सकारात्मक संवाद साधण्याचा सराव आहे, असं अनेक जाणते योगाचार्य सांगतात. योग जाणकार अनुभवी योगशिक्षकाकडूनच शिकून घ्यावा. बाळकृष्णची तब्येत बिघडल्यामुळे जर लोकांचा योग व आयुर्वेदावरील विश्वास उडू लागला तर ती भारताच्या पारंपारिक ज्ञानाची मोठी हानी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *