तमिळनाडूत डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर देशभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. ही घटना 25 ऑगस्टला घडली. अपघाताच्या कारणावरून दोन गटात झालेल्या वादांनतर पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 36 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

ज्या ठिकाणी डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती, आता तिथे तांब्याची मूर्ती लावण्यात आली आहे. तमिळनाडूतील विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी नेते या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप करत आहे. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *