एक-एक सरकारी यंत्रणेच्या खासगीकरणाची मालिका पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एअर इंडियाचं खासगीकरण होत असून, आता एअर इंडियाचा महाराजा कोणाचा बटीक होणार असा प्रश्न उभा राहिला आहे. एअर इंडियाच्या खासगीकरणाची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आज राज्यसभेत दिली.

एअर इंडियाच्या खासगीकरणाची घोषणा करतानाच याचं खापर कामगारांचे संप आणि आर्थिक संकट यांच्यावर फोडण्यात आलं आहे. एअर इंडिया या विमान कंपनीवर सुमारे 58,351 कोटी इतकं कर्ज आहे. आता या विमान कंपनीला चालवणं सरकारला शक्य नाही असंही हरदीपसिंह पुरी यांनी सांगितलं. एअर इंडियाला अजून 20 विमानांची आवश्यकता आहे. खासगीकरणामुळे आर्थिक परिस्थिती ही सुधरेल असं पुरी यांनी सांगितलं.

मुंबई विमानतळ बंद झालेलं नाही अशी माहिती पुरी यांनी राज्यसभेत दिली. दर तासाला 45 उड्डाणे होत असत. आता मात्र 36 उड्डाणे होत आहेत. विमानतळावर काही अडचणी असून, त्या लवकरचं दूर करण्याचे आश्र्वासन पुरी यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *