काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आपापसातील हेवेदावे आणि निष्क्रियता यामुळेच माझा पराभव झाला असा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून त्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. आपला संताप त्यांनी पत्राद्वारे मुंबई काँग्रेस अध्यक्षांना कळवला होता. हे पत्र आता बाहेर आलं आहे.

उत्तर मुंबईत प्रचार यंत्रणेचे निमंत्रक संदेश कोंडविलकर होते. तर संयोजनाची जबाबदारी भूषण पाटील यांच्यावर होती. या दोघांनीही प्रचार यंत्रणेत प्रचंड गोंधळ घातल्याचा आरोप उर्मिला मातोंडकर यांनी थेट केलाय. दोहोंकडे राजकीय समजच नव्हती. कार्यकर्त्यांना नीट जबाबदारी दिली जात नव्हती, कोणाला काही सांगितलं जात नव्हतं. प्रचार साहित्याचं नीट वाटप होत नव्हतं. लोकांपर्यंत पॅम्प्लेटसही पोचत नव्हती. कोंडविलकर, पाटील यांच्यामुळे प्रचार यंत्रणा कोलमडून पडली होती, असा आरोपही उर्मिलाने केला आहे.

कोंडविलकर, पाटील यांच्या या निष्क्रियतेबाबत संशय व्यक्त करून या दोघांवर कारवाई करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी पत्राद्वारे केली आहे. उर्मिलाने हे पत्र मिलिंद देवरा यांना १६ मे रोजी लिहिलेलं आहे. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. आता देवरांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची राजीनीमा दिल्यानंतर हे पत्र चर्चेत आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *