• १९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषा ओलांडून अनेक ठिकाणी कब्जा केला.
 • याबाबतची माहिती तिथल्या गुरख्याने भारतीय सैन्याला दिली.
 • भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी कॅप्टन सौरभ कालिया यांच्या समवेत सहा जवान ५ मे १९९९ ला तिथे पाठवले. तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर हल्ला केला. आणि घुसखोरी झाल्याचं सिद्ध झालं.
 • सुरुवातीला ही मुजाहिद्दीन स्वरूपाची घुसखोरी भासल्याने लवकरच संपवता येईल असं वाटलं.
 • टेहळणीसाठी पाठवलेल्या कॅप्टन सौरभ कालिया यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. त्यांचे डोळे फोडण्यात आले. कानात गरम लोखंडी सळई टाकण्यात आली.
 • घुसखोरांचे आलेलं प्रत्युत्तर नियोजनपूर्वक होतं. वरवर वाटणारी घुसखोरी नियोजनपूर्वक असल्याचं लक्षात आल्यानंतर कारगिल युद्धाला सुरुवात झाली.
 • पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता. मात्र, मुशर्रफ यांनी १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेतल्याचा दावा केला.
 • भारतीय सरकारने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिल युद्धासाठी कार्यवाही चालू केली.
 • भारताने अर्ध सैनिक आणि वायुदल मिळून एकूण ३०,००० सैनिक कारगिल युद्धात वापरले.
 • ५००० पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती.
 • भारतीय वायुसेनेकडून ‘ऑपरेशन सफेद सागर’ सुरू करण्यात आलं. या ऑपरेशनद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली.
 • पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्यापुढे पराभूत होणार हे कळताच मुशर्रफ आण्विक हल्ला करणार होते. मात्र, चहुबाजूंनी दबाव आल्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला.
 • २६ जुलै १९९९ ला भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *