@सुनील तांबे 

या विषयावर सोशल लाईफ नावाच्या एका संस्थेने यू ट्यूब वर एक व्हिडियो प्रसारीत केला आहे. त्यामध्ये भारतातील सर्वाधिक प्रगतीशील दहा राज्यांची आकडेवारी आहे.
१. महाराष्ट्र 
    २०१८ सालचं जीडीपी- ४३० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी- १.६४ ट्रिलियन डॉलर्स
२. गुजरात-
  २०१८ सालचं जीडीपी – २३० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १५ टक्के
२०३० सालचं जीडीपी- १ ट्रिलियन डॉलर्स
३. तामिळनाडू 
२०१८ सालचं जीडीपी – २५६ डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी- ९७७ बिलियन डॉलर्स
४. कर्नाटक 
    २०१८ सालचं जीडीपी – २१७ बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी- ८२८ बिलियन डॉलर्स
५. उत्तर प्रदेश
२०१८ सालचं जीडीपी – २३० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी- ७६६ बिलियन डॉलर्स
६. पश्चिम बंगाल
     २०१८ सालचं जीडीपी – १६० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी – ६९६ बिलियन डॉलर्स
७. मध्य प्रदेश 
२०१८ सालचं जीडीपी- १६० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढीचा दर – १६ टक्के
२०३० सालचं जीडीपी- ६२२ बिलियन डॉलर्स
८. तेलंगण
२०१८ सालचं जीडीपी– १३६ बिलियन डॉलर्स
सरासरी वाढ– १५ टक्के
२०३० सालचं जीडीपी– ५९१ बिलियन डॉलर्स
 ९. आंध्र प्रदेश
२०१८ सालचं जीडीपी– १३६ बिलियन डॉलर्स
सरासरी वाढ– १६ टक्के
२०३० सालचं जीडीपी– ५९१ बिलियन डॉलर्स
१०. राजस्थान
२०१८ सालचं जीडीपी– १४० बिलियन डॉलर्स
सरासरी वाढ– १४ टक्के
२०३० सालचं जीडीपी– ५३४ बिलियन डॉलर्स

इतर राज्यांची कामगिरी जोडली तर २०३० सालचं जग भारतकेंद्री असेल.
अमेरिका, युरोप, चीन, जपान इथले विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतील. भारतातील विद्यापीठांना, संशोधन संस्थांना, आयआयएम, आयआयटी यांना जगातून मागणी येईल. भारतीय विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवा यासाठी आंदोलनं होतील. राज्यघटनेत बदल केले जातील.
गुगुल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट इत्यादी कंपन्यांची मुख्यालयं भारतात येतील.
जगातील बुद्धिमत्ता– वैज्ञानिक, डॉक्टर, तंत्रज्ञ, उद्योजक, कुशल कामगार, भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी धडपडू लागतील.
एनआरआय सहकुटुंब भारतात परततील.
परराज्यांतील नव्हे तर परदेशातील लोकांना प्रवेश देऊ नका असं आंदोलन करणार्‍या संघटना व पक्षांना वाढता पाठिंबा मिळेल. राज ठाकरे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत धावू लागतील. प्रदीर्घ काळ पंतप्रधान असणार्‍या नमोंना राज ठाकरे आव्हान देतील.
हेडगेवार, गोळवळकर, दीनदयाळ उपाध्याय यांची नावं विविध रेल्वे स्टेशन्स, बंदरं, विमानतळ यांना दिली जातील. लाखोंच्या संख्येने अल्पसंख्य हिंदू धर्मात परत येतील.
भारतातीय नागरिकत्व स्वीकारणार्‍यांना हिंदू धर्म स्वीकारणं सक्तीचं केलं जाईल.
समकालीन साधू-संतांची संख्या वाढेल. अनेक विदेशी नागरीकही सर्वसंगपरित्याग करून विविध आखाड्यांमध्ये दाखल होतील.
आयआयटीमध्ये प्राचीन भारतीय विमानविद्येचा अभ्यास सुरू होईल. मंत्र बळाने भारत चंद्रावरच काय विश्वातील अनेक ग्रह, उपग्रहांवर अवकाशयानं पाठवेल.
गाईला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळेल. चलनी नोटांवर गाईचं चित्र छापलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *