
मॉब लिंचिंगच्या घटना दिवसागणीत वाढत आहेत. ‘जय श्रीराम’ ही घोषणा देण्याची जबरदस्ती केली जात आहे. या घटनांचा विरोध करत देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या पत्रावर रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप, शुभा मुद्गल, अपर्णा सेन, श्याम बेनेगल, आदींच्या सह्या आहेत. लोकांना ‘जय श्रीराम’ घोषणा देण्याची जबरदस्ती केली जाते. या घटना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारी नुसार, २०१६मध्ये दलितांविरोधात हिंसाचाराच्या ८४० घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. या घटना थांबवण्यासाठी लवकरात कायदा करण्यात यावा, अशी मागणी पत्राच्या माध्यामातून केली आहे.