
९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. हे संमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने उस्मानाबाद शहराची निवड केली आहे. अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी (२२ जुलै) पत्रकार परिषदेत दिली.
मागील काही वर्षांपासून उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन घेण्यासाठी सतत निमंत्रण पाठवलं जात होतं. यावेळी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने नाशिक आणि उस्मानाबाद येथील दोन संस्थांची निमंत्रणे स्वीकारली होती. नाशिकची निवड न करता. यंदाचे साहित्य संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादला मिळाला आहे.