मंदिर प्रवेशामुळे दलित मुलाला मारहाण

राजस्थानातील हिंदुत्ववादी ब्रिगेडची अमानुषता

केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून एक दलित मुलाला बेदम मारहाण करण्याची घटना राजस्थानात घडली आहे. दलितांवरील अत्याचाराची मालिका आता बळकट झाली आहे. हातपाय बांधून हिंदुत्ववादी गुंडांनी या मुलाला जीवघेणी मारहाण केली. यावर कहर म्हणजे पोलिसांनी गुंडांना सोडून या पीडित अल्पवयीन मुलालाच कोठडीत डांबल आहे. देशभर या घटनेने संताप व्यक्त होत आहे. राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हा अल्पवयीन दलित मुलगा देवळातुन बाहेर पडतानाच  भगवी उपरणं घातलेल्या एका टोळक्याने या मुलाला मारहाण करायला सुरुवात केली. मंदिरात शिरलासच कसा, अस म्हणत या गुंडांनी त्या मुलाचे हात पाय बांधले आणि त्याला भररस्त्यात मारहाण करायला सुरुवात केली. वेदनांनी विव्हळत हा मुलगा दयेची याचना करत होता. मी पुन्हा मंदिरात जाणार नाही. मला माफ करा अस सांगत तो हात जोडत होता. मात्र बेभान गुंड त्याच्यावर तुटून पडले होते. मुलगा अर्धमेल्यावस्थेत पडल्यानंतर मुलाच्या मामाने त्याला वाचवले. या अमानुष मारहाणीचं चित्रीकरणही अनेकांनी केलं.

मुलाच्या मामाने याबाबाबत पोलिसांत धाव घेतली मात्र मारहाण करणाऱ्या गुडांचा भाजप पक्षाशी संबंध असल्याने पोलिसांनी घटनेची दखल घेतली नाही. उलट आरोपी गुंडाच्या तक्रारीवरून पीडित मुलाच्या विरोधातच तक्रार नोंदवण्यात आली. एका मुलीची छेडछाड काढल्याची बिनदिक्कत तक्रार नोंदवत जखमी पीडित मुलालाच पोलिसांनी कोठडीत टाकलं आहे. आता या मुलाचा मामा न्यायाची भीक मागत आहे.
सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस मात्र विपरीत कारवाई करत आहेत. देशभर ह्या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *