पिलाटस बेसिक ट्रेनर विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सीबीआयने सांगितलं आहे. सीबीआयने वादग्रस्त शस्त्रास्त्र विक्रेता संजय भंडारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये एअर फोर्स, संरक्षण मंत्रालय आणि पिलाटस एअरक्राफ्ट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

२००९ साली इंडियन एअर फोर्ससाठी ७५ पिलाटस एअरक्राफ्ट विमान खरेदीचा २८९५ कोटी रुपयांचा करार स्विस कंपनी बरोबर करण्यात आला होता. या करारामध्ये ३३९ कोटींची लाच देण्यात आली, असा आरोप सीबीआयने केला आहे.

सीबीआयने संजय भंडारीच्या मालकीच्या ऑफसेट इंडिया सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचं नाव एफआयआर मध्ये घेतलं आहे. पिलाटस लिमिटेडला नेमकी कुठली सेवा दिली त्याचा तपास सीबीआय करीत आहे.

एअर फोर्समध्ये निवड झालेल्या वैमानिकांना बेसिक प्रशिक्षणार्थी विमानांमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण दिलं जातं. एचटीपी-३२ या स्वदेशी बनावटीच्या विमानांचा वापर शक्य नसल्याने एअर फोर्सने पिलाटस पीसी-७ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *