
निर्भीड, परखड विचारांचा अभिनेता,नाटककार,विचारवंत गिरीश कर्नाड यांचं बंगळूर येथे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. राजकीय दबावाला बळी न पडता आपले विचार खंबीरपणे मांडणारे, तसेच अर्बन नक्षलवादासारखा भ्रामक संकल्पनेला ” हो मी आहे अर्बन नक्षलवादी म्हणून सडेतोड उत्तर देणारे डॉ. गिरीश कर्नाड यांचं निधन अत्यंत दुःखद आहे. गिरीश कर्नाड यांनी ययाती, तलेदंड, नागमंडल,हयवदन,तुघलक यांसारखी गाजलेली नाटकं लिहिली. गिरीश कर्नाड यांच्या लिखाणासाठी त्यांना १९९८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. १९७४ साली पद्मश्री तर १९९२ साली पद्म भूषण सन्मानानं कर्नाड यांना गौरविण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर कर्नाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली