माणूस देवधर्माच्या नावाखाली कीती हैवान होतो ? 

चोरीच्या आरोपातून मुलाला भाजलं

@दिलीप चव्हाण

आर्वी जिल्हा वर्धा येथील 6 वर्षाचा चिमुकला आर्यन खडसे देवीच्या मंदिर परिसरात खेळत होता.मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरल्याचा आळ घेत त्याला एका हिंस्त्र ढोरे नामक व्यक्तीने नागडे करून तापत्या फरशीवर बसविले.त्याचे हातपाय बांधून मारहाण केली.
ढोरे इतका हिंसक का झाला? कारण ढोरेच्या डोक्यात जात होती.आर्यन वैदिक धर्मा नुसार शूद्र होता.6 वर्षाचा मुलगा दानपेटीतील पैसे चोरून काय करेल? कोवळ्या वयात मोकळे पटांगण दिसले म्हणून खेळायला जाणारा आर्यन देवी जवळ चोरी करून कुठे जाईल?
मेंदूच्या नसा बंद झालेल्या लोकांच्या डोक्यात जात,धर्म व काहीतरी कारणे काढून आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांना,त्यांच्या लेकरांना त्रास देणे,हत्या,बलात्कार,शोषण करून त्यांना आर्थिक-सामाजिक स्थिती आपल्यापेक्षा कमी ठेवणे त्यासाठी नेहमी झटत राहणे.गुन्हे करणे.देशभर सुरू असतं.
आर्वी असू देत किंवा मग कन्याकुमारी.देशातील कोणत्याही कोपऱ्यात,कोणत्याही शहरात जा.जातीयवाद हा टोकाचा दिसून येतो.त्याचे स्वरूप गंभीर दिसून येते.सहा वर्षाचा आर्यन ते 80 वर्षाचा म्हातारा असा कुणीही असू देत.जात बघून राग व्यक्त करण्याची पद्धत,आरोप करण्याची मानसिकता तयार होते.इतक्या मोठ्या प्रमाणात ही जात मेंदूत घुसलीय.
फोटो,त्या मुलाचा त्रास आणि ती क्रूर व्यक्ती.माणूस देव-जात-धर्म यांच्या नावावर फक्त हिंसक बनू शकतो.शांत नाही.इतकंच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *