सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

वादळी वाऱ्याने विजेसह लँडलाईन व मोबाईल सेवा बंद

वेधशाळेचा अंदाज चुकवत एक दिवस आधीच कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारपासून वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली. गेले चार दिवस उष्णता वाढली होती. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी ५ जूनला केरळ मध्ये पावसाचं आगमन झालं होतं. त्यामळे येणाऱ्या पाच ते सहा दिवसात पाऊसाचं कोकणात आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

कणकवली परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने तेथील वीज बंद पडली आहे. तसेच ढगांचा गडगडाट होत असल्याने तेथील लँडलाईन आणि मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे. सावंतवाडीसह अन्य भागात पावसाने गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पहाटेच हजेरी लावली. वादळी वाऱ्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळलं. झाड कोसळल्याने कुडाळ-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *