आमची अध्यात्मिक शांतता बिघडवु नका!

  • बिहारमधे योग्य उपचाराअभावी अनेक लेकरं मेली.
  • त्याच बिहारमधे भाजून काढणार कडक ऊन असह्य झाल्याने चार दिवसात जवळपास शंभर लोक उष्माघाताने मेलेत.
  • महाराष्ट्रात एक अजाण लेकरु मंदीरात गेल म्हणून जातदांडग्यांनी निर्दयपणे त्याच्या पार्श्वभागाला भाजेपर्यंत त्याला तापलेल्या टाईल्सवर बसवले.
  • महाराष्ट्राचा आर्थिक पहाणी अहवाल कृषी व उद्योग क्षेत्रात राज्याची घसरण झाल्याच दाखवतोय.

या असल्या बातम्या आमच्यासमोर अजिबात आणु नका.

  • शत्रु राष्ट्राला निदान क्रिकेटच्या मैदानावर तरी धडा शिकवायला हवा असताना बेरोजगारी, तरुणांची वाढती व्यसनाधिनता असले कमी महत्वाचे प्रश्न ऑप्शनला ठेवण आम्हाला शिकवल गेलय आणि आम्ही ते स्विकारलय…

नकली राष्ट्रवादाच्या उन्मनी अवस्थेत पोहोचलेलो आम्ही “ब्रम्ह सत्य, जगत मिथ्या” या संस्कारातून आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला या मिथ्या, ऐहिक गोष्टीत अडकवु नका…

 

आमची अध्यात्मिक शांतता बिघडवु नका!

 

@सुभाष वारे

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *