छात्रभारतीने शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

एसएससीचे अंतर्गत गुण कमी केल्याने छात्रभारती आक्रमक

एसएससीचे अंतर्गत गुण घटवल्याने मुख्यमंत्री विनोद तावडे यांना काळे झेंडे दाखवत छात्रभारती संघटनेने निदर्शनं केली. ‘शिक्षणमंत्री होश में आओ’, ‘विनोद तावडे गो बॅक’, ‘विनोद तावडे खुर्ची खाली करा’, अशा घोषणा देत प्रभादेवीचा रवींद्र नाट्य मंदिराचा परिसर शुक्रवारी दणाणून सोडला. शिक्षणमंत्री विनोद तावडे दहावी व बारावीच्या  करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनाला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर येथे आले होते.

छात्रभारती सोबत चर्चा करताना तुकड्या वाढवत आहोत. तसेच लेखी परीक्षांचे गुण धरावेत यासाठी केंद्राशी बोलणी सुरू आहे असं सांगितलं. त्यावर छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले यांनी तुकडी वाढीने प्रश्न मिटणार नाहीत. सर्व अनुदानित तुकड्या आणि महाविद्यालये एसएससी बोर्डासाठी राखून ठेवावीत, असा आग्रह छात्रभारतीने धरला आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठकीचे आश्वासन विनोद तावडे यांनी दिलं असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश सदस्य समाधान बागुल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *