राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी ‘Barefoot’ या पुस्तकात भारतीय क्रिकेट आणि खेळाडू यांच्याबद्दल बरेच काही लिहीले आहे.
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी मानसिक स्वास्थ्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी ‘Barefoot’ या पुस्तकात भारतीय क्रिकेट आणि खेळाडू यांच्याबद्दल बरेच काही लिहीले आहे. त्यांनी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरबाबात विविदास्पद माहिती दिली आहे. पण, याच पुस्तकात त्यानी माजी कर्णधार महेंद्रसिंग दोनीचे गोडवे गायले आहे. शिवाय यात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकणातील आरोपी एस श्रीसंत याच्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. याच पुस्तकात त्यांनी भारतीय संघासोबत काम करत असतानाच्या मोठ्या चुकीचा खुलासा केला. भारतीय खेळाडूंना सेक्स करण्याचा मस्करीत दिलेला सल्ला, हा कारकिर्दीतील मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले.
अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात लिहीले की,” 2009मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी अप्टनने भारतीय खेळाडूंसाठी एक अहवाल तयार केला होता. ज्यात त्यांनी सामन्याआधी सेक्स केल्याने होणारे फायदे नमूद केले होते.” त्यांच्या या सल्ल्यानंतर बराच गदारोळ उठला. मात्र, आपण खेळाडूंना सेक्स करा, असा सल्ला दिला नव्हता ती केवळ माहिती होती, असे स्पष्टीकरण अप्टन यांनी दिले होते.
अप्टन म्हणाले,”मी खेळाडूंना असं काही करा असे सांगितले नाही. मी केवळ माहिती नमूद केली होती. प्रसारमाध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. ती एक मस्करी होती. खेळाडूंना मी कशाला सामन्याआधी सेक्स करण्याचा सल्ला देईन? ही मस्करी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *