विधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत : देवगड व सावंतवाडी मतदारसंघावर दावा

शिवसेनेच्या जागांवर भाजपचा दावा !

 

लोकसभा निवडणूका संपल्यानंतर विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसेना युती असतानाच विधानसभेत भाजप मात्र स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असून पारंपारिक देवगड व सावंतवाडी मतदारसंघ यावर आज भाजपने दावा केला आहे अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी आमदार राजन तेली यांनी येथे दिली

वेंगुर्ला येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक भाजपा तालुका कार्यालयात माजी आमदार तथा प्रदेश सचिव राजन तेली व भाजपा प्रदेश कार्यालय सहसचिव शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपाने स्वतंत्रपणे लढवावा अशी मागणी करण्यात आली आज जिल्ह्यात भाजपकडे एक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष उपसभापती तसेच पंचेचाळीस ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असून त्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून सत्तावीस हजारचे दिलेले लिड असून यामध्ये सर्वाधिक वाटा हा भाजपचा असल्याचा दावा आमदार माजी आमदार राजन तेली यांनी करीत या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कमळ चिन्ह जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विधानसभेची निवडणूक ही भाजपाला अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले परंतु सर्व निर्णय हे पक्षप्रमुख घेतील असेही तेली म्हणाले त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजप-सेना युती असली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि सेना ही स्वतंत्रपणे लढण्याची चिन्ह दिसत आहेत.

सिंधुदुर्ग वेंगुर्ला सुरेश कौलगेकर

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *