
मुंबई । तरुणांना वेड लावणाऱ्या व्हिडिओ मेंकिग अॅप म्हणजेच ‘टीक टॉक’ आता बंद झालं आहे. टीक टॉक अॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावले होतं. येता – जाता कुठेही सहज या अॅपमधून अनेकजण मनोरंजक व्हिडिओ बनवत होते. मात्र यावरून अश्लील व्हिडीओ आणि हिंसाचारास प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. म्हणूनच गुगल आणि अँपलला प्ले स्टोअरमधून टीक टॉक’ अॅप डिलीट करण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिले होते. आज अखेर गुगल आणि अँपलने प्ले स्टोअरमधून टीक टॉक’ अॅप डिलीट केलं आहे. त्यामुळे ‘टीक टॉक’ ची क्रेझ असणाऱ्यांना आता ‘टीक टॉक’ करता येणार नाही.
पुढील सुनावणी 22 एप्रिलला
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे. पण त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या टिकटॉक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. केंद्र सरकारने गुगल आणि अॅपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अॅप हटविण्यास सांगितले होते. यानंतर आता ‘टिकटॉक’ हे अॅप गुगल आणि अॅपलने आपल्या प्ले स्टोअरमधून डिलीट केलं आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अॅप डाऊनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हे अॅप आहे त्यांना ते पहिल्यासारखं वापरता येणार आहे.
‘टीक टॉक’चा भारतात मोठा वर्ग
चीनी अॅप असलेल्या ‘टीक टॉक’चा मोठा ग्राहक वर्ग भारतात आहे. मागील तिमाहीत टीक टॉक हे अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड होणाऱ्या अॅपमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकाचे अॅप ठरले होते. मार्च तिमाहीत टीक टॉकने १८.८ कोटी नवे युजर्स जोडले होते. त्यापैकी भारतातील ८.८६ टक्के युजर्स होते. मागील वर्षी अॅपच्या ५० कोटी युजर्सपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक युजर्स हे भारतातील होते.