मुंबई । मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील पाणीसाठा आटत चालला आहे. ऐन उन्हाळयाच्या दिवसात मुंबईकरांवर पाणीसंकट ओढावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मुंबईकरानो आतापासूनच पाणी जपून वापरा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत, एप्रिल महिन्यातील ही सर्वात निचांक पातळी आहे.

भातसा धरणात २६ टक्के साठा

मुंबईला भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि अप्पर वैतरणा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या सातही धरणांमध्ये आजघडीला ३.७४ लाख मिलियन लिटर पाणीसाठा आहे. अप्पर वैतरणा आणि विहार धरणात २० टक्के, तर तुलसी धरणात ४२ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २६ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी

मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल का?

सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला असला तरी, या ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास मुंबई महापालिका अधिकारी व्यक्त करत आहेत. या सर्व परिस्थितीवर संबंधिति विभाग बारीक लक्ष ठेवून आहेत. संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात मुंबई महापालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी निश्चिंत असले तरी, मिळालेल्या आकडेवारीवरुन भविष्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार, हे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *