काॅंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द उर्मिला यांनीच राष्ट्र सेवा दल आयोजित मेळाव्यात ही माहिती दिली. भाजपचे पदाधिकारी आता उर्मिलाच्या विरोधात याही पातळीवर उतरतायत हेच दिसतंय.

उर्मिलाच्या एका मुलाखतीतील वक्तव्यावर धर्म भावना दुखवल्याने हा गुन्हा दाखल केला गेलाय असं कळतं. ‘माझ्या विरोधात काहीच मुद्दा चालत नसल्याने ही भाजपची मंडळी आता खोट्यानाट्या तक्रारींवर गुन्हा दाखल करताहेत,’ असं सांगत उर्मिला म्हणाली, ‘मी हिंदुधर्म मानते पण, विद्वेष आणि हिंसा मानत नाही. माझा धर्म मला वसुधैवं कुटुंबकमची शिकवण देतो, वैष्णव जन तो तेणे कहिये… म्हणणाऱ्या गाधीजींचा हिंदू धर्म मी मानते, आणि साने गुरूजी म्हणतात तसं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच तत्व मी मानते.’

पुढे असंही उर्मिला म्हणाल्या की, माझी बदनामी करण्याचे सर्व मार्ग अवलंबूनही मी विचलीत न झाल्याने ही मंडळी या पातळींवर उतरली आहेत. खोटे आरोप करून, सत्य बाजूला ठेवून ही माणसं वाट्टेल ते करत आहेत, मी याचा विचारांच्या पातळीवरच मुकाबला करीत राहीन. मात्र लोकांनीही उठून आवाज चढवायला हवा असं आवाहनही उर्मिला यांनी केलंय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *