भिवंडी : लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांना मतदान करता यावे व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी  दिव्यांगांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येणार आहेत. लोकसभा मतदार संघ भिवंडी (प) १३६ अंतर्गत दिव्यांगांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी मतदार केंद्रांवर अधिकाधिक  सुविधा देण्यात येणार आहेत.त्यानुसार या मतदारसंघात सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सदानंद जाधव यांनी विशेष मेहनत मेहनत घेतली आहे. निवडणुकीसाठी राज्यात ३ लाख ९ हजार २३३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे.लोकसभा मतदार संघ भिवंडी (प) अंतर्गत दिव्यांगांसाठी अनेक विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.दिव्यांगांना मतदान करणे सोयीचे व्हावे,यासाठी मतदार केंद्रांवर अधिकाधिक  सुविधा देण्यात येणार आहेत.भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सुलभ निवडणुका” हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.भिवंडी १३६ मतदारसंघात अंध/अल्पदृष्टी, मुकबधिर अस्थिव्यंग असलेले  मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी करण्यात आलेले  १०३ मतदार आहेत.मतदारसंघातील दिव्यांगाचा शोध घेऊन मतदानाच्या दिवशी वाहनांतुन त्यांना बुथवर आणणे याशिवाय अनेक योजना राबविण्यात येणार आहेत.
अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय,
मतदार मदत केंद्राची व्यवस्था, मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा, मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक,
 विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा,निवडक शाळांमध्ये विकलांग मतदारांसाठी सहाय्यकारी मतदान केंद्र, अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्रयांसारख्या सुविधांकडे जाधव यांनी विशेष लक्ष्य दिले आहे. विशेष म्हणजे आजकाल असलेले सोशल मिडीयाचे वाढते प्रमाण पाहता सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सदानंद जाधव यांनी मतदारसंघातील मतदार जागृतीसाठी फेसबुकवरील bhivandi parlimentary constituency
 या पेजच्यामाध्यमातुन मतदार जागृती करण्यात येत आहे.२ आठवड्यात या पेजला ५०० हुन अधिक लाईक मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *