राज ठाकरे यांच्या सभांमुळे सध्या अख्खा महाराष्ट्र देशभर गाजतोय. देशभर राज ठाकरे यांच्या भाषणांचे अनुवादित व्हिडिओ प्रसारित होतं आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भाजपची आयटी गँग राज ठाकरेंनी आपल्या भाषणात मांडलेल्या मुद्द्यावर न बोलता वेगळंच कायतरी करतेय. राज ठाकरेंवर अनेक वैयक्तिक मेसेज बनवून सोशल मीडियावर पाठवताना दिसतेय. त्यातच त्यांनी २०१४ ला मोदींचा कसा जयजयकार केला याचे व्हिडिओ पाठवले जात आहेत. ते पण मोदी भक्त आहेत. असे काहीबाही मेसेज पाठवीत आहेत. राज ठाकरे यांनी २०१४ ला मोदी यांना सहकार्य केलं. मात्र त्यानंतर भर सभेत लाखो लोकांसमोर, ही मोठी चूक झाली हे देखील मान्य केलं. आज होणाऱ्या प्रत्येक सभेत राज ठाकरे हेच मांडतायत. पण भक्त ह्यावर बोलायला तयार नाहीत !

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं तर, त्यांनी आधी २०१४ ला GST ला विरोध केला. मात्र प्रधानमंत्री झाल्यावर हळूच GST आणला. त्यानंतर स्वतःच्याच गुजरात मधून शिव्या पडल्यावर तोच च GST कमी केला, अरे मग कां आणला ?… यावर उत्तर नाहीं.२०१४ च्या अगोदर मनमोहन सिंग यांनी फक्त बिल स्वरूपात लोकसभेत मांडलेल्या ५१% FDI ला विरोध केला. मग प्रधानमंत्री झाल्यावर स्वतः १०० % FDI आणले. कां?… उत्तर नाही.

2014 आधार ला विरोध करणारा नरेंद्र मोदी पुढे प्रधानमंत्री झाल्यावर स्वतः चं आधार आणतात. यावर काही समाजसेवी संस्था कोर्टात जनहित याचिका टाकतात, यावर कोर्टाने सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी कोर्टात बोलावूनही जात नाहीत.जनतेला सोडा कोर्टालाही उत्तर द्यायला तयार नाही.मग अशा व्यक्तीला काय बोलावे… हा दुतोंडी विषारी साप नाहीतर काय आहे? त्यामुळेच माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांला या लबाड नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा माफी मागून, चूक कबूल करणारा राज ठाकरे बरा वाटतो.

नरेंद्र मोदी तर पत्रकार परिषद सोडा जनतेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाहींत. त्यांनी जर काही चांगले कार्य केले असते तर त्याच्या भाषणात त्यांनी ते मांडले असते.
पण त्यांच्या भाषणात काय?… महाराष्ट्रात आल्यावर पवार कुटुंब, बंगाल मध्ये गेल्यावर ममता बॅनर्जी, बिहार मध्ये लालू कुटुंब आणि यात सगळीकडे फोडणीला नेहरू गांधी कुटुंब आहेच. कधीतरी सर्जिकल स्ट्राईक याखेरीज काहीही नाहीं. जे नरेंद्र मोदी निवडणूकी अगोदर मनमोहन सिंग यांना अतिरेकी कारवाया आणि आर डी एक्सबद्दल प्रश्न विचारत होते, ते नरेंद्र मोदी पुलवामा मध्ये २५० किलो आर डी एक्स कसे आले? आमचे चुकले, आमची सुरक्षा कमी पडली यावर बोलायला तयार नाहीत. जे भाजप प्रवक्ते चॅनेलवर स्वतः नोटबंदी, GST आणि FDI हे किती चांगले सांगत असतात. यावर मोदी आणि हे भाजप नेते आपल्या प्रचाराच्या भाषणात चकार शब्द काढत नाहींत. त्यांच्या भाषणात काय असतं? … तर मोदींनी 5 वर्षात जेवढं काम केलंय ते ६० वर्षांत झालं नाहीं.” म्हणजे मोदींनी नक्की काय केलं?… “असं आमच्या सारख्यांनी विचारलं कि, देशद्रोही बोलायचं, भक्तांकडून आणि हाती असलेल्या पोलीस यंत्रणे द्वारे धमक्या द्यायला सुरु करायच्या. एवढं हे डोळ्यासमोर असूनही हे नमोरुग्ण एवढे मेंदूचे गुलाम कसे?

खरं तर मी नमोरुग्णांशी बोलणंच बंद केलंय. कारण ते बुद्धिप्रामाण्यवाद जाणत नाहीत. ते स्वतः च्याच बुद्धीशी बदमाशी करत आहेत. ते श्रद्धाळू आहेत, श्रद्धा ठेवणारे भक्त आहेत. श्रद्धेचा अतिरेक कधीही संकटाची चाहूल असतो आणि सगळ्या प्रकारच्या अतिश्रद्धा ह्या समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी धोकादायक असतात. असो, २३ मे ला जे होइल ते होइल, ते आम्हा लोकशाहीवाद्यांना मान्यच असेल. पण हे एक नक्की की, मी महाराष्ट्रभर व्याख्यानासाठी जात असताना हे अनुभवलंय की, क्रांतीची नवी लढाई सुरु झाली आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या दंडेलशाही विरोधात आणि मनुवादा विरोधात एकत्र येतोय, तो या लढाईत नेतृत्व करायला तयार होतोय. आता ह्या क्रांतीच्या लढाईचा शेवट कधी होतो हेच पाहावं लागेल.

सरते शेवटी कवी दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या चार ओळी आठवतायंत…
ले मशाले चल पडे है लोग मेरे गाव के
अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गाव के
चिखती है हर रुकावट ठोकरो कि मार से
बेडिया खनका रहे है लोग मेरे गावं के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *