नवी दिल्ली । राफेल लढाऊ विमान खरेदी करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला मोठा झटका दिला आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आधी दिलेला निर्णय कायम ठेवणं आणि पुनर्विचार याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. जी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीत पीठापुढे झाली .न्यायालयात सादर केलेली कागदपत्रं मान्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. राफेलशी संबंधित जी कागदपत्रं लीक झाली होती, त्याच्या आधारे फेरविचार याचिकेवर सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेत ‘लीक’ कागदपत्रांचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने लीक झालेली कागदपत्रं वैध असल्याचं सांगितलं आहे.

नवीन तारीख निश्चित केली जाणार
सर्वोच्च न्यायालयानं लवकरच पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करण्यासाठी तारीख ठरवेल आणि त्याची सुनावणी मेरीटनुसार होईल, पुढील सुनावणीसाठी नवीन तारीख निश्चित केली जाणार आहे. असे याचिका दाखलकर्ते अरुण शौरी यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *