
नितीन पंडित । भिवंडी – सतराव्या लोकसभा निवडणूकीचंं रण चांगलच तापू लागलंं आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात २ एप्रिलपासून सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवार अखेरच्या दिवसापर्यंत २२ उमेदवारांनी २९ नामांक्नंं दाखल केली आहे. त्यामध्ये ७ राजकीय तर ७ अपक्षांचा समावेश आहे.
हे आहेत अर्ज भरणारे उमेदवार
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुरेश टावरे, भाजप ,शिवसेना ,रिपाइ युतीचे कपिल पाटील ,संभाजी ब्रिगेडचे संजय काशिनाथ पाटील,वंचित – बहुजन आघाडीचे डॉ.अरुण सावंत,बाळाराम विठ्ठल म्हात्रे (अपक्ष ),दिपक पंढरीनाथ खांबेकर (अपक्ष ), योगेश मोतीराम कथोरे (बहुजन महापार्टी ),फिरोज अब्दुल रहीम शेख ( अपक्ष ),देवेश (बबलू ) पाटील (अपक्ष ),कपिल जयंत पाटील (अपक्ष ), डॉ.नूरुद्दिन निजामुद्दीन अन्सारी (समाजवादी पक्ष ), सुहास धनंजय बोंडे (अपक्ष ) ,कपिल यशवंत ढमणे (अपक्ष ) ,संजय गणपत वाघ ( भारतीय ट्रायबल पार्टी ) , विश्वनाथ रामचंद्र पाटील ( अपक्ष ), सुरेश काशिनाथ टावरे ( इंडियन नॅशनल काँग्रेस ) ,नवीद हसन मोमीन ( अपक्ष ) ,सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे ( अपक्ष ), मुमताज अब्दुल सत्तार ( बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ) ,मन्सूर उमर अंतुले ( बहुजन महा पार्टी ) , राजू रामभाऊ सोनवणे ( बहुजन मुक्ती पार्टी ), नितेश जाधव आदी २२ उमेदवारांचे २९ उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले आहेत.
या उमेदवारांनी भरले एका पेक्षा अधिक अर्ज
मंगळवार अखेरच्या दिवसापर्यंत भिवंडी लोकसभा मतदार संघात २२ उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी एका पेक्षा अधिक अर्ज भरले. भाजप,शिवसेना ,रिपाइ युतीचे कपिल पाटील यांनी ४ उमेदवारी अर्ज भरले. देवेश पाटील (अपक्ष ), डॉ.नूरुद्दिन निजामुद्दीन अन्सारी (समाजवादी पक्ष ) आणि वंचित – बहुजन आघाडीचे डॉ.अरुण सावंत यांनी दोन अर्ज भरले.