महाराष्ट्र । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये येत्या गुरुवारी म्हणजेच १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. देशभरातील १३ राज्यांमधल्या एकूण ९७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील एकूण दहा जागांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल गुरुवार २३ मे २०१९ रोजी जाहीर होतील. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी (११ एप्रिल) पार पडला. १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांत ९१ जागांसाठी एकूण ६९.४३ टक्के मतदान झालं.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघ
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल..

याचबरोबर आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिसा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये देखील मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या प्रचारतोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *