नवी दिल्ली  । लोकसभा निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉंग्रेसने आधीच आपला जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. ‘जय जवान, आज ‘जय जवान, जय किसान’चा नारा देत भाजपने निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, सुष्मा स्वराज आणि अरुण जेटली समवेत अनेक नेते उपस्थिति होते.  निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. संकल्प पत्र या नावाने भाजपाने जाहीरनाम्याला प्रसिध्द केलं.

भाजपच्या संकल्प पत्रातील मुद्दे

 शेतकरी, गर्भवती महिला या घटकांच्या आरोग्याची काळजी
 सुरक्षा दलाचं सशक्तीकरण करतानाच त्यांना फ्रि हँड देण्याचं आश्वासन
 छोट्या दुकानदारांना पेन्शन देण्याची घोषणा
 शेतकऱ्यांना ६ हजार रुपये आणि पेन्शन
 सर्व लहान मुलं आणि गर्भवती महिलांचं २०२२ पर्यंत लसीकरण करणार
  ५० शहरांत मेट्रोचं जाळं निर्माण करणार
 प्रत्येक घरांत नळाद्वादे पाणीयोजना
 रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यासाठी भारतमाला २.० द्वारे राज्यांना मदत करणार
  शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी योजनेचा लाभ देणार
 ५ किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *