भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंती निमित्त आज दि. १४ एप्रिल रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस् असोसिएशन’तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान सर जे.जे.समूह रुग्णालयात ऍडमिट असलेल्या बाराशेहून अधिक रुग्णांना पौष्टिक जेवणाची मेजवानी दिली ,ज्यात हाय प्रोटीन डायट म्हणून अंडा करी आणि ड्रायफ्रुट्सयुक्त तुपाचा शिरा देण्यात आला. रुग्णांना पौष्टिक जेवण मिळालं तर त्यांचा आजार लवकर बरा होण्यास मदत होते म्हणूनच हा कार्यक्रम राबविण्यात आला.

ही बाब जेजे हॉस्पिटलच्या इतिहासात पहिल्यादाच होत आहे. उपक्रमासाठी आर्थिक तजवीज करण्यात डॉ.आकाश खोब्रागडे, डॉ.कोळी, डॉ.त्वष्टी खोब्रागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. हॉस्पिटलचे डीन, अधीक्षक,सिनिअर डॉक्टरस्, वैद्यकीय अधिकारी, समाजसेवा अधीक्षक, किचनचे कर्मचारी,आणि वॉर्ड मधील नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचाही या उपक्रमासाठी हातभार लागला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *