दिल्ली । चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्समध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह धोनीने एक नवा विक्रम नोंदवला. या विजयासह आयपीएलमध्ये १०० सामने जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार ठरला आहे.

धोनी ‘प्लेअर ऑफ द मॅच’
जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत ७ बाद १५१ धावा केल्या. तर चेन्नईने ४ बाद १५५ धावा करत राजस्थानला मात दिली. ४३ चेंडुंमध्ये २ चौकार आणि ३ षटकारांसह महेंद्रसिंह धोनीने ५८ धावा करत चेन्नईला विजय मिळवून दिला. त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ अवार्डनेही गौरवण्यात आलं. या विजयासह आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करत १०० सामने जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने आतापर्यंत १६६ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आहे.

सर्वाधिक सामने जिंकणारा गौतम गंभीर दुसरा
धोनीनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळत सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा खेळाडू म्हणजे गौतम गंभीर. गंभीरने १२९ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं असून त्यातील ७१ सामने जिंकले आहेत. पण गंभीरने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिसरा क्रमांक रोहित शर्माचा लागतो ज्याने ९४ सामन्यांपैकी ५४ सामन्यांत विजय मिळवला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि पुणे रायझिंग वॉरियर्स या दोन्ही संघांचे नेतृत्व केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *