रामपूर : लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारा दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं . याप्रकरणी आजम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामपूरच्या शाहाबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शाहाबाद मेजिस्ट्रेट महेश कुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामपूरच्या शाहाबादमध्ये निवडणूक प्रचार सभेत आजम खान यांनी नाव न घेता भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्यावर निशाणा साधला होता . ‘ज्यांना हात पकडून आम्ही रामपूरमध्ये आणले, त्यांच्याकडून 10 वर्षे प्रतिनिधित्व केलं. त्यांचा खरा चेहरा समजण्यासाठी १७ वर्षे लागली. १७  दिवसांमध्ये कळालं की यांची अंतरवस्त्रे खाकी रंगाची आहे’, असे आजम खान म्हणाले. या प्रचार सभेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव देखील उपस्थित होते. हे विधान भाजपाने गांभीर्याने घेतले असून माफीची मागणी केली आहे.

दोषी आढळ्यास निवडणूक लढणार नाही – आजम खान
वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टरीकरण देताना आजम खान म्हणाले की, मी कोणाचे नाव घेऊन बोललेलो नाही. जर दोषी आढळ्यास निवडणूक लढणार नाही. मी नऊ वेळा रामपूरचा आमदार होतो. मंत्री देखील होतो. काय बोलायचे ते मला माहिती आहे. मी माझ्या विधानामध्ये कोणाचे नाव घेतले हे सिद्ध करुन दाखवावे. जर मी कोणाचा अपमान केला आहे हे जर सिद्ध झाले तर निवडणुकीतून माघार घेईन असे त्यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांचे ट्विट
आजम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मुलायम सिंह यांनी एक पत्र ट्वीट केले आहे. मुलायम भाई, तुम्ही समाजवादी पार्टीचे पितामह आहात. तुमच्या समोर रामपूरमध्ये द्रौपदीचे चीर हरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे मौनात राहण्याची चूक करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *