गेल्या काही दिवसांत भाजपनेत्यांना आणि कार्यकर्त्यांना चोप मिळत असल्याच्या बातम्या गाजत आहेत. काही ठिकाणी भाजप कार्यकर्ते हाणामारीवर उतरत आहेत तर काही ठिकाणी मार खात आहेत असं सध्याचं चित्र आहे. कोणत्याही प्रकारे अशा हाणामारीचं कोणीच समर्थन करणार नाही. मात्र देश आणि राज्य ताब्यात असलेल्या भाजपाईंवर अचानक असे हल्ले का होवू लागलेत याचा विचारही करायला हवा.
देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत अनेक हल्ले चढवले आहेत. मात्र लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्या नंतर भाजपच्या नेत्यांना लोकांनी चोप दिल्याच्या अनेक घटना घडत आहेत.
महाराष्ट्रात तर भाजप अंतर्गत आणि भाजप-शिवसेना असा संघर्ष सुरू आहे.भाजप अंतर्गत संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती अंमळनेरच्या मेळाव्यात. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या देखत तुफान मारहाण झाली. याची झळ त्यांनाही पोचली. या मारहाणीत ढुंगण शेकून निघालं. मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात विश्वासार्ह असलेल्या माणसावर ही पाळी का आली?
हे का घडलं?
गिरीश महाजन म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ब्ल्यू आय बॉय… मुख्यमंत्र्यांच्या अडचणीला धावून येणारा माणूस. अण्णा हजारेंचं आंदोलन असो की शेतकर्‍यांचा मोर्चा असो, त्यातील हवा काढण्यासाठी महाजन साीय असायचे. सेटर अशी त्यांची ख्याती तयार झाली आहे. या लोकसभेत तर सुजय विखे-पाटील, रणजितसिंग मोहिते-पाटील यांना आपल्या गाडीत घेवून त्यांना भाजपमध्ये नव्याने राष्ट्रवाद घुसवला. महाजनांची ही मध्यस्थी अनेक भाजपाईंना पटत नव्हती. इंडिया शायनिंग करणार्‍या प्रमोद महाजनांनी त्यावेळी जो फंडा केला होता त्याचीच री आता गिरीश महाजन ओढत आहेत. भाजपमधली हाणामारी ही याच सगळ्याचा परिपाक आहे.
दुसर्‍या बाजूला मोदी लाट ओसरताना पाहताना भाजप कार्यकर्त्यांनी हाराकिरी सुरू केली आहे. आणि लोक त्यांना फटके मारत आहेत. बोरिवलीत याचाच प्रत्यय पहायला मिळाला. उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलिसमोर मोदी मोदी नारे देत अश्लील चाळे करणार्‍या कार्यकर्त्यांना लोकांनीच फटकावलं.
गेल्या पाच वर्षात खूप बाता झाल्या. ज्या पद्धतीचं राजकारण झालं त्याने आता पक्षांतर्गत लाथाळ्या सुरू आहेतच. आणि बाहेरही लोक ऐकून घ्यायला तयार नाही. तोंडाच्या बाता, ढुंगण खाई लाथा या म्हणीचा प्रत्यय सध्या भाजपला येतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *